IIचालते नाणे जयाचे II

चालते नाणे जयाचे फक्त आहे भाव त्याला
भाव सरता नाव विरते घाव त्याचा काळजाला

जोडल्याविन हात जातो रोजचा भावीकही
त्या क्षणाला शेंदराचे मोल कळते पत्थराला

सूर जुळता ऐकू येती हुंदक्यांतनु ही तराणे
मी पणाचा डंख होता मैफिली जाती लयाला

झोकूनी तुफान जाती कस्पटेही आसमंती
वादळे मिटताच जातो डौल त्यांचा ही लयाला

उगवत्याला जोडती कर रीत आहे या जगाची
मावळाया जो निघाला दावती का पाठ त्याला

Comments