IIमाझ्या रुपान उभ्या गावाचाII

गडी रांगडा झटक्यात माझ्या
नुस्त्या नजरेनं हेलपाटला
माझ्या रुपान उभ्या गावाचा
जल्ला कालिज करपाटला
कुनी गातोय लागट गानी
कुनी भरतोय राशनपानी
कुनी हात पाय जोडुन म्हंतो
होशील का माझी रानी
नाक्यावरती फ्यान क्लब माझा
आजकाल पिसाटला
माझ्या रुपान उभ्या गावाचा
जल्ला कालिज करपाटला
सारी जनता तरनीताठी
माझ्या फिरतीया पदरापाठी
अरधा पिकला बाबा कुनी
लावतो कलप माझ्या साठी
दादा म्हंताच टेलर माझा
कंप्लिट भैसाटला
माझ्या रुपान उभ्या गावाचा
जल्ला कालिज करपाटला

Comments