IIमन तुझ्याच साठी झुरतेI

तू असशील तिथेच रमते
भोवती तुझ्या भिरभिरते
रोज शोधुनी नवा बहाणा
तुझ्या  त हरवुन बसते
मन तुझ्याच साठी झुरते
मन तुझ्याच साठी झुरते
तो
हसतात लोक बघणारे
म्हणती मी तुझा दिवाणा
प्रेमाचा हळव्या माझ्या
सोडवना तूच उखाणा
शब्दांचे मोहळ माझ्या
ओठावर येउन अडते
मन तुझ्याच साठी झुरते
मन तुझ्याच साठी झुरते
ती
कळतात मलाते सारे
भलभलते तुझे बहाणे
वाटते मलाही हवेसे
चोरून ते तुझे पहाणे
आरशातही माझ्या जागी
चेहरा तुझा मी  बघते
मन तुझ्याच साठी झुरते
मन तुझ्याच साठी झुरते
    

Comments