Iघोटाळा घोटाळा झालाI

नादावला बाई नादावला
कुनापाई जीव नादावला
भांबावला जरा भांबावला
कशा पाई  अस्सा भांबावला 
अर्ध्या रातीला मी झाले येडीपिशी
माझा डोळ्याला लागेना डोळा
पावनं sss  घोटाळा  घोटाळा झाला
कोरस
कसा झाला कवा झाला
कदी आनी कुनी केला
कशान घोटाळा झाला
सांग ज्यानं कुनी केला
कदी आला गेला  कशी
खबर न्हाई कुनाला
पावनं sss  घोटाळा  घोटाळा झाला
अंतरा-
रोजरोज दुरून  ईशारा करताय हो
  नुसता...  तुम्ही नुसता
कायमाय बोलून मिशित मधाळ
 हसता...  उगा हसता
तुमच्या या खेळात 
नजरेच्या जाल्यात ओढू नका
उगाच मांडून नुस्ताच
 हो डाव मोडू नका
माझं मलाच मी सांगा रोखू किती
वेड्या जीवाला लागलाय चाळा
पावनं sss  घोटाळा  घोटाळा झाला

Comments