IIबोलवेना सोसवेना II

बोलवेना सोसवेना या जीवाची वेदना
गुंतविला जीव वेडा एवढा झाला गुन्हा
सोडलास तू हात हा जरी
सोडवू कशा सांग भावना
ठेच लागल्या पावलांस या
कोणती खरी वाट सांगना
स्वप्न भाबडे आज भंगले
बंध रेशमी का दुभंगले
सुन्या सुन्या जीवनी या
सुन्या सुन्या जीवनी या
कोण जाणे प्राक्तनाने काय गोंदले
गुज माझ्या अंतरीचे सांग मी सांगू कुणा
गुंतविला जीव वेडा एवढा झाला गुन्हा
चाहुली तुझ्या या खुणावती
भास बोलके वेड लावती
सूर ओल्या आठवांचे
सूर ओल्या आठवांचे
पोळलेल्या या मनाला साद घालती
काळजाला जाळती कालच्या सा-या खुणा
गुंतविला जीव वेडा एवढा झाला गुन्हा
- गुरु ठाकुर

Comments