IIकाळजात मुक्काम केलाII

नकळत माझ्या लइ दिसानी
असा जिव्हारी रुतला कोनी
भलत्या येळी मोहर फुटला
आणि शिर्शीरी पानोपानी...

जरी होता साधा भोळा .. 
त्यानं अवचित भिडवुन डोळा 
सारा नजरेनं कारभार केला
कसा कदी बाइ त्यानं  .. 
मला कळलाच न्हाइ 
काळजात मुक्काम केला
कोरस-
कुणी सरदार मोठा की तालेवार होता 
या खेळामदी तो मुरलेला
कि नुस्ताच पावना गर्दितला 
तुझ्या रुपानं झपाटलेला
अंतरा १
झाली जिवाची घालमेल सुरु.. 
उमगेना काय मी करु
जाई तोल आता नजरेचा 
लागलीया उगा भिरभिरु
कुठं गेला कदी कोन्या गावा
त्याचा लागेना काही सुगावा
अगंबाई बाई बाई..काळजात मुक्काम केला
कोरस-
कुणी कारभारी मोठा की सरकारी होता 
शिक्कारी त्यो ट्पलेला
कि नुस्ताच पावना गर्दितला 
तुझ्या रुपानं झपाटलेला
अंतरा १
नाव पुसाया नवता येळ 
सारा घटकेत झाला खेळ
माझी मलाच इसरुन गेले 
जवा डोळ्याला भिडलं डोळं
जिव अलगद कापुस झाला
पिसं भलतंच लावुन गेला
अगंबाई बाई बाई..काळजात मुक्काम केला
कोरस-
कुणी फेटेवाला होता की टोपीवाला होता 
तुझ्या इश्कात भरकटलेला

कि नुस्ताच पावना गर्दितला 
तुझ्या रुपानं झपाटलेला

Comments