IIअवखळसे स्पर्श ते हरवले का असेI

अवखळसे स्पर्श ते हरवले का असे
तु मला सांगना सांगना..
दरवळती भोवती भास सारे तुझे का असे
सांगना सांगना सांगना..
गुरफटला जीव हा सोडवू मी कसा
तू मला सांग ना सांगना

चालता चालता हरवली सावली
पावले गुंतता वाट भांबावली
साद देती तरी का तुझ्या चाहुली
तू मला सांग ना सांगना....
अवखळसे स्पर्श ते हरवले का असे
तु मला सांगना सांगना..

आठवांचे तुझ्या चालती सोहळे
रोखले मी जरी पापणी ओघळे
सावरु ह्या मना मी कसे या क्षणी
तू मला सांग ना सांगना...
अवखळसे स्पर्श ते हरवले का असे
तु मला सांगना सांगना..


Comments