IIमदनिके घडीभर थांबुन बोल...II

तो   चटक लावुन येड्या जिवाला
कशाला घाल्तेस कुलुप व्हटाला
उनाडलंय बग काळीज माझं
उर्रात वाजतो ढोल
मदनिके घडीभर थांबुन बोल...

ती   काय तुझ्या मनात आलं माझ्या ध्यानात
जिथे तिथे तुझीरे घाई घाई घाई
तो  पोरी तुझ्या रुपानं उठलंय तुफान
रात रात झोप मला नाई नाई नाई
ती   नको उतावळा तू होवु जरा धिरानं घे
तो   नको मधाळ बोलुन टाळू जरा मिठीत ये
पिसाटलाय जीव उधाणलाय
त्याचा सुटाया लागलाय तोल
मदनिके घडीभर थांबुन बोल...

ती   लाज भिड सोडुन रित भात मोडुन
घालु नको पिंगा तू थांब थांब थांब
तो   वाट तुझी बघुन जीव गेला विटुन
जाउ चल निघुन लांब लांब लाब
ती   नको चोरुन मारुन राजा थाटामाटानं ये
तो   नको आडून बोलू तू राणी एक ईशारा दे
झाकु नको गुज मनातलं
जरा व्हटाची मोहर खोल

मदनिके घडीभर थांबुन बोल... 

Comments