॥बघ उघडूनी दार॥




विसर तू ती वाट तो जुना प्रवास संपला
नव्या नव्या दिशा आता खुणावती पहा तुला
नको उशीर बघ अधीर होवूनी कशी आता
नवी पहाट सांगते मिठीत घे जरा मला....
नको ढळू नको वळू भरून जोश वाहूदे
नको तू सावरू आता खुशाल तोल जाउदे
याद राहूदे ईथे जो थांबला तो संपला
नवी पहाट सांगते मिठीत घे जरा मला....

Comments