|| सर सुखाची||



"गुणगुणावे गीत वाटे,शब्द मिळू दे थांब ना,
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना,
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना,
तोल माझा सावरू दे थांब ना....

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा,
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा...

सापडाया लागले मी,ज्या क्षणी माझी मला,
नेमका वळणावरी त्या, जीव हा भांबावला,
खेळ हा तर कालचा,पण आज का वाटे नवा,
कालचा हा खेळ बघ वाटे नवा....

बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे,
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे,
वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा,
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा..."

गीतकार : गुरु ठाकूर,
 गायक : अभिजीत,बेला शेंडे, 
संगीतकार : निलेश मोहरीर
गीत संग्रह/चित्रपट : ’मंगलाष्ट्क वन्स मोअर’
 (२०१३)

Comments

Post a Comment