॥ शबय शबय ॥



आल्गुन फाल्गुन शिमगा नि होळी 
फुकाची चिँता जिवाला जाळी.
शिकार झाली बघा सावध आणि
 आपल्याच जाळ्यामधे गावलाय कोळी
शबय शबय भलि शबय शबय 
 शबय शबय भलि शबय भली

धावतोय दिवस रात्रीच्या मागे
स्वार्थाच्या चिंधीला सत्तर धागे
ऊद्याच्या खुंटीला टांगल्या जीवाला
हाव-या आशेचे वारुळ लागे
काळाचा कावळा बोंबलून सांगे
जिथे अती तिथे मातीच झाली
शबय शबय भलि शबय शबय  
शबय शबय भलि शबय भली

आहे जे ज्याच्या कडे सरेना खाऊन
नाही तो जगतो जिवाला मारून
भरल्या पोटाची खा खा सरेना
ऊपाशी सांगे बघ भूकच मेली
शबय शबय भलि
शबय शबय  शबय शबय भलि शबय भली

Comments