|| दिवस ओल्या पाकळ्यांचे...||



"दिवस ओल्या पाकळ्यांचे
जाणिवांना गंध ओले
स्पंदने बेभान आणि
हात हाती गुंफलेले,

दिवस वेडे स्वप्नपंखी
रेशमाची झूल झाले,
ओंजळीने मागण्या
आधीच झरले मेघ सारे....

दिवस मोहरल्या मनाचे
सुख नवे घेऊन आले
,चांद थोडा लाजला अन्
चांदणे टिपूर झाले..."

"दिवस ओल्या पाकळ्यांचे
जाणिवांना गंध ओले

गीतकार : गुरु ठाकूर,
 गायक : स्वप्निल,बेला
संगीतकार : निलेश मोहरीर
गीत संग्रह/चित्रपट : ’मंगलाष्ट्क वन्स मोअर’
 (२०१३)

Comments