|| अप्सरा आली इंद्रपुरीतुन ||



कोमल काया कि मोहमाया पुनवचांदनं न्हाली
सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्‍नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली रत्‍नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली

छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार

ही रती मदभरली दाजी ठिनगी शिनगाराची
कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वार्‍याची
 ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहुन थिजली इंद्रसभा भवताली

Comments

  1. अप्रतिम लावणी.
    गीत आणि संगीत दोन्ही आघाड्यावर हे गीत अत्यूच्य दर्जाचे झाले आहे.
    मी आजवर ऐकलेल्या लावण्यापैकी ही माझी सर्वात जास्त आवडीची लावणी आहे.

    गीतकाराला मी वाकून मुजरा करत आहे. :)

    ReplyDelete
  2. खूप खूप सुदंर लावणी...वाटतं की जणू खरचं अप्सरा खाली अवतरली... झकास...!!

    ReplyDelete

Post a Comment