॥ हरवली पाखरे ॥



कुठे कधी हरवले कसे कोण जाणे चोचीतले त्यांच्या गाणे
 नभाच्या मनाला पडे घोर आताउखाणे कसे सोडवावे
 कसे वागणे हे कळ्यांचे फुलांशी कळेना 
कधी वाढले हे दुरावे  कळेना,
झुरे बाग आता सुनी सुनी सारी,
का कळेना अशी हरवली पाखरे 

ती अवखळ वेडी किलबिल सारी
 उगीच मनाला हुरहूर लावी
 सांजेला होई जीव हळवा रे 
जे झाले गेले विसरुनी सारे
 हा वेडा वारा सांगे अरे अंगणी पुन्हा रे
का कळेना अशी हरवली पाखरे

Comments