।। माउली माउली।।

विठ्ठल विठ्ठल ... विठ्ठल ... विठ्ठल
तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली ..!!
वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली
 गळाभेट घेण्या भिमेची निघाली तुझ्या नामघोषात इंद्रायणी ...!!

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ...!!!
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली ...!!!
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी  जीवाला तुझी आस का लागली ?
जरी बाप सार्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली ...!!!
माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे !!! - २

चालतो तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा !!
टाळ घोषांतुनी साद येते तुझी दावते वैष्णवांना दिशा ...!!!
दाटला मेघ तू सावळा , मस्तकी चंदनाचा टिळा
 लेउनी तुळशीमाळा गळा या पाहसी वाट त्या राउळा

आज हारपले देहभान जीव झाला पुरा बावळा
पाहण्याला तुझ्या लोचनात भाबड्या लेकरांचा लळा
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली ...!!!
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली ?
जरी बाप सार्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली ...!!!
माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे !!! - २

विठ्ठल विठ्ठल ... विठ्ठल ... विठ्ठल

चालला गजर ... जाहलो अधीर ... लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला ...
देखिल कळस ... डोईला तुळस ... दावितो चंद्रभागेसी ...
 सामिपही दिसे पंढरी... याच मंदिरी... माउली माझी ...
मुखदर्शन व्हावे आता । तू सकळ जगाचा त्राता
घे कुशीत या माउली तुझ्या पायरी ठेवितो माथा ...

माउली माउली माउली माउली माउली माउली
 माउली माउली माउली माउली माउली माउली
माउली माउली माउली माउली माउली माउली
माउली माउली माउली माउली माउली माउली
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ... श्री ज्ञानदेव तुकाराम  पंढरीनाथ महाराज कि जय !!!


गीतकार : गुरु ठाकूर, गायक : अजय गोगावले 
संगीतकार : अजय - अतुल, 
गीत संग्रह/चित्रपट : लैभारी (२०१४)

Comments

  1. सर्व प्रथम गुरु जी तुमचे मनापासून आभार आणि अभिनंदन...
    खरंच आम्ही तर फक्त लिहितो पण तुम्ही शब्द जागे करता,लेखणीतून जणू शाई नसून अमृत ओसंडते...माझी भावना शब्दातून व्यक्त करता येईल असे शब्द तर माझ्या कडे नाहीत पण एवढं अगदी मनापासून म्हणू शकतो कि तुम्ही साक्षात शब्दांचे गुरु आहात...तुमची जादू तुम्हीच जाणो आम्ही तर जणू बेधुंद असतो तुमचे गीत ऐकताना...परमेश्वराची असीम कृपा आहे तुमच्यावर..."माऊली" हे जे गीत तुम्ही लिहिलंय त्याबद्दल तर तुमची करेल तितकी प्रशंसा कमी आहे...ज्याला परमेश्वराची एवढी मोठी देणगी आहे त्याला मी १ सान काय देऊ शकणार म्हणा पण मनापासून तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो...त्याबरोबरच रितेश भैय्या लातूरकर आहेत आणि मला अभिमान आहे कि मी एक लातूरकर आहे...आपला १ चाहता आणि गायक/लेखक/कवी... पांडुरंग :)

    ReplyDelete

Post a Comment