|| उसवले धागे...||



"उसवले धागे कसे कधी, सैल झाली गाठ
पावलांना ही कळेना, का हरवली वाट

का किनारे फितूर झाले, वादळाला ऐनवेळी,
कोणत्याही चाहुलीवीण, का अशी स्वप्ने बुडाली
मागण्या आधार उरला, एक ही ना काठ

सावली म्हटली तरीही, भावना असती तिला
सोबतीची आस वेडी, का अजून लागे मला
गुंतणे माझे सरेना, तू फिरवली पाठ

वाटते आता हवे, ते तुझे गंधाळणे
पोळलेल्या या जीवा, दे जरासे चांदणे
सोसवेना चालणे हे, एकटे उन्हात..."

गीतकार : गुरु ठाकूर,
 गायक : मंगेश,किर्ती
संगीतकार : निलेश मोहरीर
गीत संग्रह/चित्रपट : ’मंगलाष्ट्क वन्स मोअर’
 (२०१३)

Comments

  1. शब्द हे मनातले ओठावर गीत होवून पाझरावे,
    तशी तू बावरी जीवनी माझ्या श्रावणी होवून बरसावे || धृ ||

    गहिवरले मन बावरे सारे अन् धुदावल्या आज भावना,
    गुज हे बावर्या मनाचे अजून तूला कसे कळेना सागंना
    एकटाच भिजतो आहे आठवात मी जरा सोबती ये ना...


    ...अबौल मी

    ReplyDelete

Post a Comment