|| मथुरेच्या बाजारी ||

|| मथुरेच्या बाजारी ||

दहीदुध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी
बावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरुन बाईमथुरेच्या बाजारी
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ?
नटखट भारी किस्‍नमुरारी टपला यमुनातीरी
करतोय खोडी घागर फोडी जाऊ कशी चोरून बाई
मथुरेच्या बाजारी ... कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ?

नकोस फोडु कान्हा माझी घागर आज रिकामी
हसेल सारी गोकुळ नगरी होईल रं बदनामी
आज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे
रितीच घागर नशीबी माझ्या,
शरण तुला मी आलेदेवा शरण तुला मी आले

वाट अडवून हसतो गाली ग वेणु ऐकुन मोहित झाले
भान हरपून रमती गोपिका, शामरंगी न्हाऊन गेले
मन भुलवी असा कान्हा झुलवी असा हा नटनागर गिरीधारी
त्याच्या संग दंगले, रास रंगले, पिरतीची रीत न्यारी
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ?

Comments

  1. सुंदर!
    हे गीत गवळण या प्रकारामध्ये मोडते ना?

    ReplyDelete

Post a Comment