॥ गजाल खरी काय॥



उरफाट्या गावाचा उर्फाटा चाळा
पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
सशाने शिकार केली वाघाची
शिंव्हाला भिडे गाय ...
होय म्हाराजा
गजाल खरी काय....होय महाराजा!!!

मुंगीच्या मुताने वाहिला
हत्तीसतीच्या दाराला तांबडी बत्ती
माणूस मेला हातून म्हणून 
मांजर काशीला जाय  ...
.होय महाराजा
गजाल खरी काय....होय महाराजा!!!

उभ्या गावामध्ये झाला ठणाणा
मेंढयाने गेंडयाला केला ऊताणा
फुगता फुगता बेडकी बैलाच्या
दुप्पट झाली गे माय ...
होय म्हाराजा गजाल खरी काय....होय महाराजा!!!!!!               


Comments

Post a Comment