IIवाली तू लेकरांचाII

वाली तू लेकरांचा अन तूच पाठीराखा
फिरवून पाठ जाशी का सांग मायबापा
न्हाई देवा भूक मोठी
चूक माझी घाल पोटी
जीव दारी रे तुझ्या हा टांगला....
विठठला... विठठला... विठठला...

आस वेडी झाली बेडी
धावताना तोल गेला
फासली मी राख देवा
तू दिलेल्या हुन्नराला
बाधली रे मोहमाया
आज माघारी फिराया
वाट दावी तूच आतारे मला ....
विठठला... विठठला...

Comments

Popular Posts