॥ ही गुलाबी हवा ॥



ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा
हाय श्वासातही, ऐकू ये मारवा

तार छेडी कुणी, रोमरोमातुनी
गीत झंकारले, आज माझ्या मनी
सांज वाऱ्यातही, गंध दाटे नवा
ऐकू ये मारवा ...

का कुणी रंग हे, उधळले अंबरी
भान हरपून मी, कावरीबावरी
का कळेना तरी, बोलतो पारवा
ऐकू ये मारवा ...


Comments

Popular Posts